एक्स्प्लोर

मुंबईत तिन्ही लोकल रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत तिन्ही लोकल रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईत आज तिन्ही लोकल रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगट ते मुंबई सेंट्रल मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे. ब्लॉक काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर धावतील. त्यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर कल्याण-दिवा जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 या वेळेत ब्लॉक असेल. कल्याणवरुन सकाळी 10.54 ते दुपारी 4.19 या वेळात सुटणाऱ्या सर्व लोकल कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.22 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद गाड्या घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर थांबतील. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान डाऊन सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. डाऊन हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/ बेलापूर/ पनवेलपर्यंतची सेवा सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत बंद राहील. डाऊन हार्बर लाइनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/अंधेरी/गोरेगावपर्यंत सेवा सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद राहील. विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर/वाशी या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रविवारी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत बंद राहील. अप हार्बर लाइनवर वांद्रे/अंधेरी/गोरेगावपर्यंतची सेवा सकाळी 10.45 ते 4.58 या वेळेत बंद राहील. यावेळी मुंबईत दाखल होणाऱ्या मेल/ एक्स्प्रेस वीस ते तीस मिनिटे उशिराने पोहचतील. तर हार्बर मार्गावर पनवेल ते कुर्ला स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही, संशय आल्यास ग्राहकांनी थेट टोल फ्री क्रमांकर तक्रार करावी : तुकाराम मुंढे
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल
Video: जय पवार धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करतील का? महिला सन्मानाचा मुद्दा सांगत म्हणत करुणा शर्मांचा सवाल

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
Embed widget