मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे. 18 वर्षाच्या आतील मुलांना आणि काही मेडिकल कन्डिशनमुळे लस घेऊ शकले नसणाऱ्या नागरिकांना आजपासून रेल्वे प्रवासासाठी पास देण्यात येणार आहे. 18 वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागेल. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा. आता 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही महत्वाच्या मेडिकल कन्डिशनमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे. अशा लोकांनी पास काढतेवेळी तसं डॉक्टरांचं प्रमाणपत्रक सादर करणं आवश्यक आहे. 


भविष्यात जर लहान मुलांसाठीची लस उपलब्ध झाली तर या वयोगटातील लोकांसाठी रेल्वे प्रवासासाठीची मुभा केवळ पुढचे 60 दिवसांसाठी असेल असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. महत्वाचं म्हणजे लोकल प्रवासासाठी केवळ रेल्वेच्या पास घरांमधूनच ही टिकीटं मिळणार आहेत. जेटीबीस, एटीएमव्ही आणि यूटीएसच्या मार्फत ही तिकीटं मिळणार नाहीत. 




या आधी 18 वर्षाखालील मुलांना लस उपलब्ध नसल्याने त्यांना रेल्वे प्रवासाची मूभा देण्यात आली नव्हती. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत होती. आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्यांची अडचण दूर झाली आहे. 


महत्वाच्या बातम्या :