Maharashtra Unlock : दसरा मेळाव्याआधी राज्य सरकारनं निर्बंध शिथिल केल्यानं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एक हजारावर शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित राहू शकणार आहेत. सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी कमाल 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटवण्यात आलीय. दसरा मेळाव्यात नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांच्या टीकेबरोबरच कायदेशीर अडचणीही निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारी पातळीवर खल होऊन केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत ही अट शिथिल करण्यात आली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत. 


... तर 50 हजार रूपयांचा दंड 


राज्यात 22 ऑक्टोबरपासून बहुतांश निर्बंधांमध्ये शिथिलता येणार आहे.  कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास एकूण क्षमतेच्या 50 टक्के  किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. आता राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबताच आदेश निर्गमित केला असून आता सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.  सभागृहात येणाऱ्या सर्वांचे लसीकरण झालेले असले पाहिजे आणि या नियमांचा भंग झाल्यास सबंधित आयोजकांना 50 हजार रूपयांचा दंड आकारला जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.  


Dasara Melava : आज दसरा मेळावे... मुख्यमंत्री ठाकरे, पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष


22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार आहेत.  गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते. 


उद्धव  ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार?


उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.  महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.