एक्स्प्लोर
घाटकोपरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत

प्रातिनिधिक फोटो
मुंबई: कार्यालये सुटण्याच्या वेळेतच मध्य रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. घाटकोपरजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही बाजूच्या गाड्या रखडल्या आहेत. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. कामावरुन घरी परतण्याच्या वेळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने ठिकठिकाणी स्टेशनवर गर्दी वाढत आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्येक लोकल गर्दीने भरली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तांत्रिक बिघाड दुरुस्त केला आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या सुटल्या असल्या तरी वाहतुकीवर गर्दीचा ताण आहे.
Before You Go
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली






















