एक्स्प्लोर

Mumbai Local Pass : आजपासून ऑफलाईन लोकल रेल्वे पास वितरणाला सुरुवात, असा मिळणार पास

Mumbai Local Pass : लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतर यासाठी पास कसा मिळणार याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.  

मुंबई : ज्या प्रवाशांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत, त्यांना मुंबई लोकल रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी सातत्याने मागणी होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय जाहीर केला. लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आली आहे.  पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामान्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.  

नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करणं सोयीचं व्हावं, त्यांना मासिक रेल्वे प्रवास पास मिळावा यासाठी कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांची ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. ऑफलाईन पडताळणी प्रक्रिया मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 53 रेल्वे स्थानकांवर तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात 109 स्थानकांवर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सलग दोन सत्रांमध्ये सुरु होणार आहे. 

कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांसाठी युनिव्हर्सल पास! रेल्वे, मेट्रो, मोनो, बस आणि मॅालसाठीही उपयोगी ठरणार

त्याआधारे नागरिकांना मासिक रेल्वे प्रवास पास रेल्वेकडून देण्यात येईल, अशी माहिती मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. यासाठी ऑनलाईन अॅप तसंच ऑफलाईन अशा दोन्ही रितीने सुविधा पुरवली जाणार आहे. अॅप तयार करुन ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्याची कार्यवाही काही कालवाधीतच सुरु होईल अशी माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.त्याआधी 11 ऑगस्टपासून ऑफलाईन प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जेणेकरुन सर्वसामान्य मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये असं चहल यांनी म्हटलं आहे.

रेल्वे मासिक पास देण्याची ही ऑफलाईन प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत आणि आठवड्यातील सर्व दिवशी सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये, असं आवाहन इक्बालसिंह चहल यांनी केलं आहे.

अशी आहे लोकल पासची प्रक्रिया 
नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोविड लसीकरण दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र व छायाचित्र ओळखपत्र पुरावा आणणे आवश्यक

पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना दिनांक 15 ऑगस्टपासून प्रवासाची मुभा

 मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 53 रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष

 संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात एकूण 109 स्थानकांवर मदत कक्ष

सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सलग दोन सत्रांमध्ये कक्ष राहणार कार्यरत

घरानजीकच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावे, मात्र विनाकारण गर्दी करु नये

 बनावट कोविड प्रमाणपत्र आढळल्यास होणार कठोर पोलीस कार्यवाही 

सर्वात महत्वाचं
मदत कक्षावरील महापालिकेचे कर्मचारी संबंधित नागरिकाच्या कोविड प्रमाणपत्राची सत्यता कोविन अॅपवर पडताळतील. तसेच छायाचित्र पुरावा देखील तपासतील. दोन्ही कागदपत्रं पडताळल्यानंतर त्यावर शिक्का मारण्यात येईल. हे शिक्का मारलेली कागदपत्रं रेल्वे स्थानकाच्या तिकिट खिडकीवर सादर केल्यावर मासिक पास मिळणार आहे. मात्र हा पास 15 ऑगस्टनंतरच लागू होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget