एक्स्प्लोर

Mumbai Local Megablock: आज ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम आणि हार्बरवर मेगाब्लॉक नाही

Mumbai Local Megablock: रविवारी ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक नसल्यानं प्रवाशांना दिलासा.

Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो, आज रविवार सुट्टीचा दिवस. आज घराबाहेर पडणार असाल आणि त्यातही मुंबई लोकलनं (Mumbai Local News) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. रविवारी ट्रान्सहार्बर मार्गावर (Trans Harbour) मेगाब्लॉक आहे, तर मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर (Harbour Railway) मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक (Megablock News) नसणार आहे. त्यामुळे या रविवारी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. 

रविवारी ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक (Megablock on Transharbour) घोषित करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली आहे. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र, आज (रविवारी) मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे आज घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर, रविवारी दिवसा ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात आला होता. 

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. वाशी (Vashi) /नेरुळ (Nerul) /पनवेलसाठी (Panvel) सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंतच्या सर्व अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. रविवारी मेन लाईन आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही याची मुंबईकरांनी नोंद घ्यावी.

ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

  • कुठे : ठाणे-वाशी / नेरुळ अप आणि डाऊन. (Thane-Vashi / Nerul Up and Down)
  • कधी : सकाळी 10.35 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत

कोणत्या मार्गांवर होणार परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी (Vashi) / नेरुळ (Nerul)/ पनवेल (Panvel) अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, रविवार मुख्य मार्गिकेवर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नसेल.

रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
Embed widget