Local Mega block : मुंबईकरांनो आज घराबाहेर जायचंय तर ही बातमी नक्की वाचा... मध्य आणि हार्बर मार्गावर 'मेगाब्लॉक'
Mumbai Local Mega block : मुंबईत आज एक तर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेवर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे.
![Local Mega block : मुंबईकरांनो आज घराबाहेर जायचंय तर ही बातमी नक्की वाचा... मध्य आणि हार्बर मार्गावर 'मेगाब्लॉक' Mumbai Local Mega Block Important news for Mumbaikars Megablock on Central and Harbor Road on Today Sunday Local Mega block : मुंबईकरांनो आज घराबाहेर जायचंय तर ही बातमी नक्की वाचा... मध्य आणि हार्बर मार्गावर 'मेगाब्लॉक'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/0256a3a356b6129c8326c6f1c31de548_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) आज रविवारी (3 जुलै) घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. आज एक तर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर रेल्वेवर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे. रविवार असल्यामुळे आज धावणाऱ्या लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे.
कोणकोणत्या मार्गांवर मेगाब्लॉग?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन मार्गावर वळवण्यात येतील.
घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबणार आहे.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत
पनवेल (Panvel) येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता सुटणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)