एक्स्प्लोर
मुंबईत लेस्बियन तरुणींचा आत्महत्येचा प्रयत्न, एकीचा मृत्यू
मुंबई : समलिंगी संबंध असणाऱ्या दोन तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मुंबईतल्या चेंबूरमध्ये घडली. या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या मुलीला वाचवण्यात यश आलं आहे.
दीक्षा आणि सिद्धिका (नाव बदलली आहेत) या शेजारी शेजारी राहायच्या. गेल्या वर्षभरापासून दोघींमध्ये समलिंगी संबंध निर्माण झाले. सिद्धिकाच्या एका नातेवाईकाने या दोघींना मरीन ड्राईव्हवर फिरताना पाहिले आणि त्याची माहिती कुटुंबीयांना दिली. याबाबत घरच्यांनी सिद्धिकाला जाब विचारल्यानंतर तिने दीक्षाशी समलिंगी संबंध असल्याची कबुली दिली.
संतापलेल्या सिद्धिकाच्या वडिलांनी शनिवारी दीक्षाची बहिणीला स्थानिक नेते महेंद्र नागते यांच्या ऑफिसमध्ये बोलावून पुन्हा सिद्धिकाशी संपर्क न ठेवण्याचा इशारा दिला. हे भांडण सुरु असतानाच सिद्धिकाने आपल्या राहत्या घरीच फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिच्यावर उपचार सुरु असतानाच खचलेल्या दीक्षाने घरी आल्यानंतर शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी दीक्षाने आपल्या रुमचा दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा तिने गळफास घेतल्याचं समोर आलं. पण दुसरीकडे जिच्यापासून दुरावल्यामुळे दीक्षाने आत्महत्या केली, त्या सिद्धिकाला मात्र वाचवण्यात यश आलं आहे.
दरम्यान या प्रकरणी सिद्धिकाचे वडील आणि स्थानिक नेते महेंद्र नागते यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement