एक्स्प्लोर

कमला मिल्स आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!

कविता आणि तेजल या 31 डिसेंबरच्या पार्टीचं प्लॅनिंग करण्यासाठी आपल्या नातेवाईंकासोबत मोजो हॉटेलमध्ये जावायला गेले.

मुंबई: कमला मिल्स कम्पाऊंडच्या अग्नितांडवात 14 जणांचा होरपळून/गुदमरुन मृत्यू झाला. यामध्ये घाटकोपरच्या कविता पियूष धाराणी आणि तेजल भावीण गांधी या बहिणींचा समावेश आहे. त्यांच्या मृत्यूची कहाणी अतिशय चटका लावणारी आहे. कविता आणि तेजल या 31 डिसेंबरच्या पार्टीचं प्लॅनिंग करण्यासाठी आपल्या नातेवाईंकासोबत मोजो हॉटेलमध्ये जावायला गेले. 31 डिसेंबरला पाचगणीला जायचं, असं जेवता जेवता ठरलं. मात्र त्याचवेळी आग लागली आणि हे सर्व कुटुंब मोजो हॉटेलमधून धावत वन अबाव्ह हॉटेलमध्ये धावत गेले. भीषण आगीमुळे कोणाला काय करायचं हेच कळत नव्हतं. कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली या दोघी बहिणी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या टॉयलेटमध्ये घुसल्या. तिथून तेजलने त्यांच्या भावोजींना फोन करुन, आग लागल्याचं सांगितलं. यादरम्यान त्यांचे सर्व नातेवाईक बाहेर पडले, परंतु या बहिणी आतमध्ये अडकल्या आणि त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण धारणी आणि गांधी कुटुंबासह घाटकोपर पूर्व विभागात शोककळा पसरली आहे. या घटनेला जबाबदार अधिकारी आणि हॉटेल मालकांवर कारवाईची मागणी नातेवाईक आणि स्थानिक नगरसेवक  पराग शहा यांनी केली आहे .  कमला मिल्समध्ये अग्नितांडव मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. काय आहे प्रकरण? हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी 29 रात्री 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू आगीत जखमी झालेल्या सहा जणांवर परेलच्या केईएम रुग्णालयात तर दोघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आणि पोलिस उपायुक्त देवेन भारती यांनी घटनास्थळाची पाहणी केली.  वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर परिणाम आगीनंतर या परिसरात असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ, झूम आणि टीव्ही9 मराठी या वृत्तवाहिनींच्या प्रसारणांवरही परिणाम झाला. काही कार्यालयं आज बंद ठेवण्यात आली आहेत. मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हॉटेल 1 Above चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व सिग्रीड हॉस्पिटॅलिटी अॅण्ड एन्टरटेन्मेंट एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे. तसंच आगीची सुरुवात वन अबाव्ह रेस्टोबारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश दरम्यान, ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. "कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत," असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. संबंधित बातम्या कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं! कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक' कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...  कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली  मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू  मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ
आज मोहिनी एकादशीला बनतायत दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार फलदायी, नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ
आज मोहिनी एकादशीला बनतायत दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार फलदायी, नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mohini Ekadashi 2024 : आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
आज मोहिनी एकादशी; अचूक मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार, लक्ष्मीची राहणार कृपा
आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार, लक्ष्मीची राहणार कृपा
Embed widget