एक्स्प्लोर
मुंबई एअरपोर्टचं नाव आता छत्रपती शिवाजी 'महाराज' आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' अशी सुधारणा करण्यात आली आहे
मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्यात आली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असा शिवरायांचा पूर्ण उल्लेख नावात करण्यात आला आहे.
यापूर्वी मुंबईतील इंटरनॅशनल एअरपोर्टला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटलं जात होतं. मात्र आता त्यात 'महाराज' या शब्दाची भर घालण्यात आली आहे.
नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील जनतेने यासंदर्भात कित्येक वर्षांपासून मागणी केली होती. ती अखेर पूर्ण झाल्याबद्दल प्रभूंनी महाराष्ट्रीय नागरिकांचं अभिनंदनही केलं. तसंच महाराष्ट्राच्या मागणीकडे लक्ष दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार व्यक्त केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत ही बातमी शेअर केली आहे. महाराष्ट्र सरकारची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांनी प्रभू आणि मोदींचे आभार व्यक्त केले आहेत.Chhatrapati Shivaji International Airport is now Chhatrapati Shivaji ‘Maharaj’ International Airport. Congratulations to the people of Maharashtra,the long pending demand is now fulfilled.I thank PM @narendramodi ji for the concern towards the sentiments of the ppl of Maharashtra
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 30, 2018
Humble tribute and respect to our great King Chhatrapati Shivaji Maharaj...! Chhatrapati Shivaji International Airport is now named as Chhatrapati Shivaji ‘Maharaj’ International Airport on GoM’s recommendation... Many thanks Hon PM @narendramodi ji & Hon @sureshpprabhu ji! https://t.co/yLzT1p5ohM
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 30, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement