एक्स्प्लोर

मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज, जेजेचा अहवाल

मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे.

मुंबई : मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयी काळजी करायला लावणारा अहवाल जेजे रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी मांडला आहे. देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज असल्याचं समोर आलं आहे. मुंबईपाठोपाठ कोलकाता आणि बंगळुरु या शहरांचा क्रमांक लागतो. मुंबईकर हे देशातील सर्वात दुःखी नागरिक असल्याचं केंद्राच्या अहवालात म्हटलं आहे. देशातील प्रथम श्रेणी शहरांशी तुलना करताना मुंबईकरांच्या मानसिक आरोग्याविषयीची माहिती समोर आली आहे. मुंबई (38 हजार 588), कोलकाता (27 हजार 394), बंगळुरु (24 हजार 348) या शहरांतील नागरिक सर्वाधिक मानसिक उपचार घेतात. विशेष म्हणजे, मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड  झालं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेतात. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार  आहे. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. चिंतेची बाब म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनाही मानसोपचाराची गरज आहे. घड्याळाच्या काट्यावर धावण्याची मुंबईकरांची सवयही याला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत. जेजे हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या वतीनं हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. 10 वर्षांच्या चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती मानसोपचार घेण्यासाठी येतात. मात्र मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती असल्याचंही यातून समोर येतं. नव्याने उद्भवणारे डिसऑर्डर : फेसबुक डिप्रेशन सायबर बुलिंग ऑनलाईन गेम अॅडिक्शन बॉडी इमेज इश्यू मुंबईकरांमध्ये दिसणारे मानसिक आजार अँक्झायटी आणि ताणतणाव नैराश्य बायपोलर डिसॉर्डर सायकोसिस ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसॉर्डर (ओसीडी) अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी) डिमेन्शिया मानसोपचार घेणारी टॉप 3 राज्यं पश्चिम बंगाल - 2 लाख 75 हजार 578 महाराष्ट्र - 1 लाख 24 हजार 400 कर्नाटक - 1 लाख 16 हजार 771

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Alert: मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
Mumbai Rain : 500 मिमी पाऊस पडूनही 'हिंदमाता' जलमुक्त! बीएमसीच्या 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्पाची कमाल
500 मिमी पाऊस पडूनही 'हिंदमाता' जलमुक्त! बीएमसीच्या 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्पाची कमाल
मद्यपान करुन पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह महागात पडला, वसईच्या भोईदा पाडा इथं एक जण बुडाला 
मद्यपान करुन पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह महागात पडला, वसईच्या भोईदा पाडा इथं एक जण बुडाला 

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Embed widget