मुंबई : दक्षिण मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. माझगाव आणि डोंगरी या अतिशय दाटीवाटीच्या विभागांना जोडणारा हँकॉक ब्रिज लवकरच पूर्ण होणार आहे. या ब्रिजसाठी पहिल्यांदाच पुलिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात स्थानिकांना हा पूल वापरायला मिळणार आहे.


मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे मिळून हा पूल बांधत आहे. त्यासाठी चंदिगडच्या एका कंपनीची मदत घेण्यात येत आहे. 1877 साली ब्रिटिशांनी हा पूल बांधला. मुंबईतील अत्यंत जुन्या पूलांपैकी हा एक पूल होता. त्यानंतर या पूलाची उंची कमी असल्याने मध्य रेल्वेच्या गाड्यांना त्याचा अडथळा होऊ लागला. त्याचबरोबर हा पूल शंभरपेक्षा जास्त वर्षांचा झाल्याने तो धोकादायक देखील बनला होता. यामुळेच 2015 साली हा पूल पाडण्याचे ठरवले गेले. त्यानुसार 2016 साली हा पूल पाडण्यात आला होता. मात्र तेव्हापासून तब्बल चार वर्ष हा पूल पुन्हा उभा राहू शकला नव्हता. या ठिकाणी पूल उभा करणे अत्यंत कठीण काम असल्याने अखेर फुल उभारण्यासाठी नवीन शक्कल मुंबई महानगरपालिकेने लढवली.



पुलिंग टेक्नॉलॉजी वापरून हा पूल चार जागी निर्माण करण्यात येत आहे. यामध्ये पूलाचा लोखंडी सापळा जमिनीवर बनवून तो नंतर हळूहळू पुढे सरकवत पुलाच्या मूळ जागी बसवण्यात येतो. दोन दिवसापूर्वीच मध्य रेल्वेने चार तासांचा ब्लॉक या कामासाठी घेतला होता. यावेळी बीएमसीने पूलाचा अर्धा भाग पुढे सरकवून ठेवला. आता उर्वरित भाग पुन्हा एकदा ब्लॉक घेऊन पुढे सरकावण्यात येईल. त्यानंतर त्या सापळल्यावर रस्ता बांधून पूल वापरासाठी सुरु करण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्यांदाच एखाद्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे..


महत्त्वाच्या बातम्या : 


मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आज तब्बल 33 दिवसांवर


मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


कोरोनासाठी 'मुंबई मेगा लॅब'ची संकल्पना, महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करण्याचे आव्हान