मुंबई : मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आज तब्बल 33 दिवसांवर पोहोचला आहे. काल हा कालावधी 30 दिवसांवर होता. 1 जूनला हा कालावधी 18 दिवस तर 10 जूनला 25 होता.रुग्ण वाढीचा सरासरी दरही आज 2.15% असून काल हा 2.30% होता. 1 जूनला हा सरासरी दर 3.85% होता तर 10 जूनला 2.82% होता.


एच पूर्वने (वांद्रे पूर्व, खार ) आज मोठी उडी घेतली असून त्यांचा रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल 69 दिवसांवर पोहोचला असून रूग्ण वाढीचा सरासरी दर फक्त 1% असा सर्वात कमी आहे.


ई (भायखळा) विभागात हे प्रमाण 61 असून रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.1% तर एफ उत्तर (माटुंगा) मध्ये रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 60 दिवस आणि रूग्ण वाढीचा सरासरी दर 1.2% आहे


रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षा जास्त असलेले विभाग




  • एम पूर्व (चेंबुर पूर्व) डबलींग रेट 54, रूग्णवाढीची टक्केवारी. ( 1.3%)

  • एल (कुर्ला) डबलींग रेट 53, रूग्णवाढीची टक्केवारी ( 1.3%)


40 दिवसांपेक्षा जास्त कालावधी असलेले विभाग




  • बी ( मशिदबंदर) डबलींग रेट 49, रूग्णवाढीची टक्केवारी ( 1.4%)

  • जी दक्षिण (वरळी) डबलींग रेट 48, रूग्णवाढीची टक्केवारी ( 1.5%)

  • जी उत्तर (धारावी, माहिम, दादर) डबलींग रेट 44, रूग्णवाढीची टक्केवारी ( 1.6%)

  • ए (कुलाबा) डबलींग रेट 43,रूग्णवाढीची टक्केवारी. ( 1.6%)


कोरोनाशी आपण तीन महिन्यांपासून लढत आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे  जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमण्याचे आदेश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.


Corona Testing Lab | एक ते दीड महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करणार 'मेगा लॅब'?