एक्स्प्लोर

नोटाबंदी काळात बुडालेला 142 कोटींचा टोल राज्य सरकार देणार

142 कोटी रुपयांपैकी 100 कोटींपेक्षा जास्त रुपये हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई एंट्री पॉइंट, वांद्रे-वरळी सी लिंक या टोल नाक्यांवरील आहेत.

मुंबई : नोटाबंदीच्या काळात बुडालेल्या टोलची रक्कम टोल कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टोल कंपन्यांना एकूण 142 कोटी रुपये फडणवीस सरकार देणार आहे. नोटाबंदीच्या काळांत वाहनधारकांची अडचण होऊ नये, यासाठी राज्यातील टोलनाक्यांवर 24 दिवस टोलबंदी जाहीर करण्यात आली होती. या टोलबंदीच्या काळात बुडालेली रक्कम राज्य सरकार कंपन्यांना देणार आहे. 142 कोटी रुपयांपैकी 100 कोटींपेक्षा जास्त रुपये हे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई एंट्री पॉइंट, वांद्रे-वरळी सी लिंक या टोल नाक्यांवरील आहेत. सुरुवातीला ही रक्कम केंद्राकडून मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला होता. मात्र केंद्राकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकार आपल्या तिजोरीतून ही रक्कम देणार आहे. टोल कंपन्यांना टोल वसुलीची मुदत वाढवून देण्याचा विचारही राज्य सरकारने केला होता, मात्र हा व्यवहार टोल कंपन्यांसाठी फायद्याचा ठरण्याच्या शक्यतेने राज्य सरकारने हा निर्णय टाळला. अखेर 24 दिवसांच्या टोलबंदीचे पैसे थेट देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. चार वेळा टोलमाफीत वाढ 9 नोव्हेंबर 2016 ला टोलमाफीची पहिली घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी 9 ते 11 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी करण्यात आली. त्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी वाढवण्याची दुसरी घोषणा करण्यात आली. तरीही परिस्थिती फारशी न बदलल्यामुळे पुन्हा 14 ते 18 नोव्हेंबर टोलमुक्ती देण्यात आली. ही तिसरी घोषणा ठरली होती. पण तरीही सुट्टे पैसे आणि बँका/एटीएमबाहेरील रांगा कमी झाल्या नव्हत्या. त्यामुळे टोलवसुली 24 नोव्हेंबरपर्यंत न करण्याचा चौथ्यांदा निर्णय झाला. अखेर हाच निर्णय 1 डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. ही पाचवी आणि शेवटची टोलमाफीतील वाढ ठरली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget