एक्स्प्लोर
घाटकोपर ब्रिजवरील वाहतूक पुन्हा सुरु
घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ब्रिज खालच्या बाजूने झुकल्यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती
मुंबई : मुंबईतील अंधेरी भागात गोखले ब्रिजचा फुटपाथ पडल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपरमध्येही ब्रिज झुकल्याचं समोर आलं होतं. घाटकोपर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा ब्रिज खालच्या बाजूने झुकल्यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. अखेर पालिका प्रशासनाने हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला.
घाटकोपर भागात मध्य रेल्वेवर असलेल्या या पुलाखालून मेल, एक्स्प्रेस आणि लोकल जातात. ब्रिजचा काही भाग खालच्या बाजूने झुकल्यामुळे त्यावर धोक्याच्या खुणा लावल्या होत्या.
अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमनचा इमर्जन्सी ब्रेक, अनेक प्रवाशांचे प्राण वाचले
महापालिकेकडून हा ब्रीज दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ब्रिजच्या दोन्ही टोकांना बॅरिकेट लावण्यात आले होते. इतकंच नाही, तर ब्रिजच्या सुरुवातीला असलेला बस स्टॉपही बंद करण्यात आला होता. ब्रिजची दुरुस्ती होईपर्यंत हा बस स्टॉप बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.. पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती, मात्र पुलाखालून जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नव्हता. अंधेरीतील गोखले ब्रिजचा फुटपाथ पडून मंगळवारी पाच पादचारी जखमी झाले होते. त्यापैकी एका महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महापालिकेने सावधगिरी बाळगली आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
Advertisement