एक्स्प्लोर

कुलगुरुंची दिरंगाई, मुंबई विद्यापीठाच्या पोरांचा परदेशी शिक्षणाचा स्वप्नभंग

चैतन्य जोशी नावाचा विद्यार्थी मुंबईतल्या वडाळ्यात राहतो. मुंबई विद्यापीठा अंतर्गत एचआर कॉलेमध्ये रिटेल मॅनेजमेंटचं शिक्षण त्याने घेतलं आहे. पुढील शिक्षणासाठी त्याला कॅनडातल्या Fanshawe university मध्ये प्रवेश घ्यायचा होता.

मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळू न शकल्यानं कुलगुरु संजय देशमुख यांनी स्वत: 15 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लावण्यात आले. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलं आहे. चैतन्य जोशी नावाचा विद्यार्थी मुंबईतल्या वडाळ्यात राहतो. मुंबई विद्यापीठा अंतर्गत एचआर कॉलेमध्ये रिटेल मॅनेजमेंटचं शिक्षण त्याने घेतलं आहे. पुढील शिक्षणासाठी त्याला कॅनडातल्या Fanshawe university मध्ये प्रवेश घ्यायचा होता. 50 हजार रुपये डिपॉझिट भरुन त्यानं जानेवारीमध्ये प्रवेशाचं पत्रही मिळवलं. पण मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अजूनही चैतन्य जोशीचा निकाल लागला नाही. परिणामी परदेशात जाऊन शिकण्याचं त्याचं स्वप्न भंगलं आहे. चैतन्यचे फक्त 50 हजार रुपयेच वाया गेले असं नाही तर त्याचं वर्षही वाया जाणार आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणारा चैतन्य एकटा विद्यार्थी नाही. विद्यापीठानं निकालाची डेडलाईन हुकल्यानं त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आहे.

मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकली

31 जुलै, 5 ऑगस्ट, 15 ऑगस्ट... विद्यापीठाने तीन डेडलाईन दिल्या, मात्र एकही पाळली गेली नाही. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं. आता तर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे, निकाल खरंच लागणार ना. 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लागले. आतापर्यंत एकूण 333 विषयांचे निकाल लागले आहेत. अद्याप 144 विषयांचे निकाल बाकी आहेत. तर 1 लाख 63 हजार 245 उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहेत. याशिवाय लागलेले निकाल कितपत योग्य आहेत, हा प्रश्नच आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायचं असेल तर त्याची तयारी त्यांना सहा महिने आधी करावी लागते. त्यासाठी आर्थिक नियोजन करावं लागतं. पण यंदा मुंबई विद्यापीठानं या सगळ्यांवर मेहनतीवर पाणी सोडलं आहे. त्यामुळे चैतन्यसारख्या अनेक विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं. याला जबाबदार कोण? त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई विद्यापीठाचा घोळ, पत्रकारितेच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण

मुंबई विद्यापीठ पेपर तपासण्यासाठी सीएंची मदत घेणार

मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget