एक्स्प्लोर
डॉ. तात्याराव लहाने यांना बढती, मात्र जेजेमधून बदली

मुंबई : अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची अखेर बदली करण्यात आली आहे. डॉ. लहाने यांना पदोन्नती देऊन वैद्यकीय शिक्षण संचलनालयात हंगामी सहसंचालक म्हणून नेमणूक केली आहे. मात्र वैद्यकीय शिक्षण संचलनालयात रुजू होण्यास डॉ. तात्याराव लहाने यांनी नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी नेत्र विभागात वैद्यकीयचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.लहानेंविरोधात तक्रार केली होती. आमच्याकडून कारकूनी स्वरुपाचं काम करुन घेतलं जातं. तसंच लहानेंकडून वारंवार मानसिक छळ होतो, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
Before You Go
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल





















