एक्स्प्लोर
मुंबईत महिला डॉक्टरचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात एका 25 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला आहे. मृत तरुणी फिजिओथेरपिस्ट असल्याची माहिती आहे. ती विलेपार्लेमधील लीलाबाई चाळीच्या पहिल्या मजल्यावरील खोली अभ्यास आणि राहण्यासाठी वापरत असे. तर आई-वडील आणि लहान बहिण तळमजल्यावर राहायचे. मृत तरुणी काल रात्री मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर गेली होती आणि 12 च्या सुमारास घरी परतली. तिला सोडण्यासाठी आलेले तिचे काही मित्र थोड्या वेळाने निघून गेले. पण रात्री साडेतीनच्या सुमारास रुममधून धूर येत असल्याचं दिसलं. याची माहिती मिळताच शेजारी-पाजारी आले आणि त्यांनी रुमचा दरवाजा उघडला. पण समोर मृतदेह त्यांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत्यूमागे मोठा कट असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे. ज्या अवस्थेत मृतदेह मिळाला आहे आणि तो जाळण्याचा प्रयत्न झाला आहे, हे पाहता तिचा मृत्यू संशयास्पद आहे. एकापेक्षा जास्त लोकांनी हे कृत्य केलं असावं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. विलेपार्ले पोलिस आणि क्राईम ब्रान्च या प्रकरणाचा तपास करत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
क्रीडा
व्यापार-उद्योग























