मुंबई : मुंबईत घरकाम करण्यास उशीर झाल्याने घर मालकीणीने  एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई पोलिसांनी एका 25 वर्षीय महिलेविरुद्ध या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने राग आल्यानंतर अल्पवयीन मुलीला कपडे काढण्यास सांगितले त्यानंतर चप्पलने तिची मारहाण केली.


 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे वय साधारण  17 वर्षे आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील महिलेने मुलीला घरी काम करण्यास ठेवले. वर्सोवा पोलिस स्थानकातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना 6 डिसेंबरला रात्री घडली. रात्री 11 च्या सुमारास मुलीला काम करण्यास उशीर झाला.  ज्यानंतर रागवलेल्या महिलेने मुलीला कपडे काढण्यास सांगितले. एवढचं नाही तर महिलेने मुलीचा व्हिडीओ देखील काढला आणि त्यानंतर मुलीची चप्पलने मारहाण केली.


या घटनेनंतर मुलीला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मुलीला घरी सोडण्यात आले. या घटनेनंतर पीडित मुलीच्या बहिणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या चुलत बहिणीच्या जबाबानंतर घर मालकीणी विरुद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध कलम 326, 354(B), 504 ECf पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या: