Mumbai Cricket Association Election 2022 : राज्यात (Maharashtra News) सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association Election) निवडणुकीकडे. आज या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका सभेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कारण या प्रचारसभेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DC Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकाच मंचावर ही सर्व मंडळी एकत्र येणं म्हणजे, खरंच दुर्मिळ योगायोग असल्याचं बोललं जात आहे. या प्रचारसभेवेळी मात्र सर्व नेत्यांनी एकमेकांवर मिश्किल टिका देखील केल्या. पण सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे, पवार-शिंदे सोयरिकीची. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या पवार-शिंदे सोयरिकीची माहिती दिली. आपणही ऐकूयात पवारांनी मुख्यमंत्र्यांना शिंदेसाहेब असं संबोधून नेमकं काय सांगितलं?


शरद पवारांनी सभागृहात बोलताना पवार आणि शिंदे यांच्यातील सोयरिकीची माहिती दिली. पवारांनी बोलण्यास सुरुवात करताच, सभागृहात एकच हशा पिकला. पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे पाहून हातवारे करुन माझे सासरे शिंदेच असं म्हटलं आणि सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडात केला. पुढे बोलताना शरद पवार बोलताना म्हणाले, "माझे सासरे शिंदेच... आणि शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्यानं विचार करावा, अशी विनंती करतो."




दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे एमसीएची बहुचर्चित निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं खेळांच्या मैदानात राजकारण्याचं काय काम असा सवाल पुन्हा पुन्हा विचारण्यात येत आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे हे दोन्ही गट आपापसातील मतभेद विसरून या निवडणुकीसाठी एक झाले आहेत. पवार-शेलार पॅनेल अशी त्या गटाची ओळख आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अमोल काळे या पॅनेलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा थेट सामना हा माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्याशी होत आहे. तसंच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हेही कार्यकारिणी सदस्यपदाची निवडणूक लढवत आहेत. चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियमच्या परिसरात आज दुपारी तीन ते सहा या वेळेत एमसीएच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


MCA Election : अजित पवार-फडणवीसांमध्ये भेट, तर शरद पवार आणि मिलिंद नार्वेकर एकाच गाडीनं रवाना! राजकीय वर्तुळात चर्चा