(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Corona Cases: मुंबईत मागील 24 तासात 1,299 रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद, रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर
Mumbai Corona Cases : मुंबईत मागील 24 तासात 1,299 रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 1,827 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजपर्यंत एकूण 6,51,216 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.
Mumbai Corona Cases : मुंबईत मागील 24 तासात 1,299 रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 1,827 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजपर्यंत एकूण 6,51,216 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण 28,508 इतके आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 326 दिवसांवर गेला आहे. तर कोविड वाढीचा दर ( 15 मे ते 21 मे) 0.21 टक्के एवढा आहे. मुंबईत काल 1416 रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 1766 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.
पुण्यात आज सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्ण
पुण्यात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्णांचे निदान झाले आहेत. आज पुण्यात 840 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर आज 1949 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. काल 21 मे रोजी पुण्यात 973 रुग्णांचं निदान झालं होतं तर 2496 डिस्चार्ज झाले होते. तर 20 मे रोजी 931रुग्णांचं निदान झालं होतं तर 1076 डिस्चार्ज झाले होते.
कोरोना निर्बंधाचे पालन न केल्यामुळे मुंबई शहरात 16 हजारांपेक्षा जास्त गुन्हे
कोरोनाची दुसऱ्या लाट असल्यामुळे राज्यात सरकारच्या वतीने 31 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे मुंबई शहरात गुन्हेगारीचं (Mumbai Crime Update) प्रमाण खूप कमी झालं आहे, मात्र जरी गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाले असले तर कोरोना निर्बंधाचे पालन न केल्यामुळे मुंबई शहरात 16 हजारांपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान सुरू असतानाही लोकांच्या हलगर्जीपणा कायम आहे. मास्क वापर, सुरक्षित वावर, गर्दी करू नका या निर्बंधांबाबत वारंवार सांगूनही लोकांकडून हे निर्बंध सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये गेल्या दीड महिन्यात उत्तर मुंबईत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले असून 5 एप्रिल पासून आत्तापर्यंत 16000 पेक्षा जास्त गुन्हे मुंबई शहरात दाखल झाले आहेत. पहिल्या लाटेदरम्यान मुंबई पोलिसांनी 27 हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल केले होते तर दुसरी लाट येताच राज्य सरकारच्या वतीने मुंबईसह राज्यभरात कडक लॉकडाऊन लावण्यात आला. या लाटेत देखी कोरोनाच्या निर्बंधांचं पालन न केल्यामुळं हजारो गुन्हे दाखल झाले आहेत. यावरुन लोक नियमांचं पालन करत नाहीत असेच स्पष्ट होत आहे.