मुंबई :  राज्यात कोरोनाच्या संख्येत (Maharashtra Corona Update) दिवसेंदवस वाढ होताना दिसत आहे.  राज्यात नव्याने आढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या देखील पाचशेपार आहे. सोमवारी  राज्यात 431 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 297 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


आज शून्य कोरोनाबाधिताचा मृत्यूची नोंद


राज्यात आज शून्य कोरोनाबाधिताचा मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,35, 385 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे. 


राज्यात 3131 सक्रिय रुग्णांची नोंद


राज्यात आज एकूण 3131 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 2238 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल  ठाण्यामध्ये 393  इतके सक्रिय रुग्ण आहेत.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर


देशातील कोरोना संसर्गातील चढउतार कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत घसरल्याचं दिसून येत आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्याआधीच्या दिवशी 2828 नवे कोरोना रुग्ण आणि 14 जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 17 हजार 698 इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. देशात रविवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 2 हजार 70 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4, कोटी 26 लाख 13 हजार 440 वर पोहोचली आहे.