मुंबई : मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत जाणारा मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट आता कमी झाला आहे. मुंबईत सर्वाधिक चाचण्या होऊनही कोरोना पॉझिटिव्हीटीचा आकडा आता कमी झाला आहे. एक महिन्यापूर्वी दोन अंकी असणारा आकडा आता एक अंकावर आला आहे.


मुंबईत सर्वाधिक चाचण्या होऊन देखील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आता कमी झाला आहे. मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या आकडेवारी नुसार 29 एप्रिला एकूण 43525 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी 4328 कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. हा पॉझिटिव्हीटी दर आता 9.94 टक्के आहे.  महिन्याच्या सुरुवातीला 4 एप्रिला हा दर 27.94 टक्के होता. त्यावेळी 51 हजार 313 चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी 11 हजार 573 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. म्हणजे महिनाभरात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जवळपास 20 टक्क्यांनी घटला आहे. 


राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, लसीचा साठाच नसल्याने नियोजन कोलमडले


मुंबईतील 85 टक्के कोरोना केसेस लक्षणं नसलेली आहेत. आता बेड्स उपलब्ध झाले आहेत. नव्या कोरोना रुग्णांची प्रकरणं घटली आहेत. सर्वाधिक 44 हजार चाचण्या होऊनही मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आहे. असा एक आकडी पॉझिटिव्हीटी रेट असलेलं मुंबई देशातील एकमेव शहर आहे, अशी माहिती आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. 


Bains Circuit : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तुटवड्यावर 'बेन्स सर्किट'चा उपाय! कसा होतो वापर


लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. मुंबईत सर्वाधिक चाचण्या होऊन देखील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट आता कमी झाला असला तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये. शासनाने दिलेली जी त्रिसूत्री आहे ती पाळावी असं आव्हान डॉक्टरांनी केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या :