मुंबई : ऑक्सिजनला प्राणवायू सुद्धा म्हटलं जात आणि ते का म्हटलं जातं याची आपल्या सर्वांना सध्याच्या परिस्थितीत प्रचिती सुद्धा आली असेल. ऑक्सिजनच्या एका सिलेंडर साठी हजारो रुपये सध्या मोजावे लागत आहेत, तर ऑक्सिजनचा काळाबाजार सुद्धा सुरू झालेला आहे. अगदी काही शे रुपयांमध्ये मिळणारा ऑक्सिजन सध्या हजारोंच्या किंमतीत विकलं जातंय. मात्र मुंबईमध्ये ग्रीन अम्ब्रेला संस्थेने गेल्या कित्येक वर्षापासून मोफत ऑक्सिजन लोकांना मिळेल असं कार्य त्यांनी केलं आहे. आता पर्यंत जवळपास एक लाख टन ऑक्सिजन ते सुद्धा मोफत मुंबईला मिळालं आहे.


इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रस्त्याच्या कडेने विक्रोळी ते नाहूर पट्ट्यात 3500 हुन जास्त पिंपळाची झाडं विक्रम यंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन अंब्रेला संस्थने लावली आहेत. त्याचबरोबर मुंबईतील अत्यंत दुर्मिळ असे 60 हुन अधिक प्रजातीचे 2000 हुन अधिक वृक्ष विविध उद्याने,मैदाने,सोसायटीच्या आवारात लावले आहेत.


निसर्गाचे आपण ऋणी आहोत आणि सामाजिक बांधिलकी जपत निसर्गाला आणि समाजाला आपण काहीतरी देण लागतो म्हणून या संस्थेची स्थापना केल्याची विक्रम यंदे यांनी सांगितलं. तसेच त्यांच्या सोबत इतर लोकंही जुळत गेली. ज्यांनी आपल्या कामातून वेळ काढत फक्त झाडं लावायची नाही तर ती व्यवस्थित वाढावी यासाठी त्यांची काळजी ही घेतली. आता पर्यंत लावण्यात आलेल्या झाडांन पैकी 90 टक्के झाडी मोठी झाली आहेत. या मध्ये 3500 पेक्षा अधिक पिंपळाच्या झाडांचा समावेश आहे जे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वातावरणात सोडतात.


Corona Jalgaon : कोरोनाची दुसरी लाट येत्या पंधरा दिवसात ओसरणार; जळगावकरांना मोठा दिलासा 


एक पिंपळाच झाडं वर्षाला 21 टन ऑक्सिजन हवेत सोडत, तसेच 17 टॅन कार्बन शोषून घेतं


हवा शुध्द करण्यासाठीही पिंपळ खुप महत्वाची भूमिका बजावतं. ग्रीन अंब्रेला ने इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर 3500 हुन जास्त पिंपळ लावले आहेत. तसेच मुंबईत एकूण 10000 हुन जास्त झाडं लावली आहेत. म्हणजेच 1 लाख टनहून अधिक ऑक्सिजन या पद्धतीनं हवेत निर्माण केला आहे.




जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनचे महत्व 10 वर्षापुर्वीच ओळखून एक आदर्श उभा केला आहे.  या संस्थेमध्ये जवळपास पन्नास लोक सहभागी आहेत आणि ते स्वतःहून सामाजिक बांधिलकी म्हणून आपला हातभार हरित मुंबई करण्यासाठी लावत आहेत. रमेश कदम असंच एकदा रस्त्याने जात असताना त्यांनी या संस्थेच्या काही स्वयंसेवकांना रस्त्याच्या कडेला काही करताना पाहिलं आणि ते कुतूहलाने त्यांच्याजवळ गेले सगळी माहिती घेतली आणि नंतर स्वतः या संस्थे मध्ये सहभागी झाले. 


महानगरपालिकेने शो ची झाडे लावण्या एवजी भारतीय संस्कृतीची संस्कृतीचे पुरातन झाडे लावली तर त्याचा जास्त फायदा होईल अशी अपेक्षा सुद्धा रमेश कदम यांनी व्यक्त केली. त्यामुळे वृक्षरोपणाचे आता फक्त मेसेज न पाठवता आपणही वृक्षरोपण करण्याची आणि त्या झाडांची काळजी घेऊन वाढवण ही काळाची गरज आहे.