Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आलेख वाढता पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 961 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी 44 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 374 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 4880 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,45,409 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 1204 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.057% टक्के इतका आहे.
सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 4880 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 501 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 960 सक्रीय रुग्ण आहेत. रायगड 167, पालघर 100, नागपूर 32, चंद्रपूर 14 आणि रत्नागिरी 14 आणि सिंधुदुर्गमध्ये 10 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 4559 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसतेय. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
भारतात कोरोना संसर्गात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 4270 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, देशात कोरोना प्रादुर्भावापासून आतापर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 2619 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
संंबंधित बातम्या