Maharashtra Corona Update : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आठ दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं दिसतेय. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1357 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 614 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,38,564 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04% एवढे झाले आहे. राज्यात आज 1494 नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार 767 इतकी झाली आहे.
मागील काही दिवसांत राज्यात आढळलेले दैनंदिन कोरोना रुग्ण -
एक जून - 1081
दोन जून - 1045
तीन जून - 1134
चार जून - 1357
पाच जून - 1494
मुंबईने टेन्शन वाढवले -
राज्यात सध्या सहा हजार 767 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 4880 इतकी आहे. तर ठाणे 960, पालघर 100, रायगड 167, पुणे 501 सक्रीय रुग्ण आढळले आहेत. नंदूरबार, धुळे, जालना आणि गोंदिया या ठिकाणी एकही सक्रिय रुग्ण नाही.
मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद -
राज्यात आज एक हजार 494 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण मुंभईतील आहे. जवळपास 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण मुंबईत आहे. रविवारी मुंबई 961 सक्रीय रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. मुंबईनंतर ठाणे मनपा 108, नवी मुंबई मनपा 99 आणि पुणे मनपा 63 रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापूर मनपा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, अहमदनगर मनपा, धुळे जिल्हा, नंदूरबार, जालना, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, उस्मानाबाद, नांदेड जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोलीमध्ये एकही रुग्ण आढळला नाही.