Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी मुंबईत 704 नव्या रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी 33 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी 349 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 349 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 3324 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,44,354 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 1765 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.039% टक्के इतका आहे.






सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 3324 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 372 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 555 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 13, रायगड 106, पालघर 58, नागपूर 32, चंद्रपूर 16 आणि रत्नागिरीमध्ये 11 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 4559 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात आज 1045 नव्या रुग्णांची नोंद


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात 1045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे राज्य सरकारही सतर्क झाले आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढतोय, सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या हजारावर, आज 1045 नव्या रुग्णांची नोंद


Nagpur Covid Testing Centers : येथे करा निःशुल्क कोव्हिड चाचणी