Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले, बीएमसी प्रशासन अलर्ट मोडवर
आम्ही सर्व रुग्णालयांमधील आढावा घेऊन तयारी करण्यास सांगितली आहे. जम्बो कोव्हिड सेंटर तसेच मोठ्या रुग्णालयांना सुद्धा अलर्ट केला असल्याची माहिती, बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
मुंबई : गेल्या आठवडाभरापासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, गेल्या दोन वर्षांपासून कोविड परिस्थिती हाताळत आहोत. आम्ही सर्व रुग्णालयांमधील आढावा घेऊन तयारी करण्यास सांगितली आहे. तसेच जम्बो कोव्हिड सेंटर व इतर मोठ्या रुग्णालयांना सुद्धा अलर्ट केला असल्याची माहिती, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.
मुंबईत कोरोना वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर बीएमसी अलर्ट मोडवर आहे. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आरोग्य विभागाचाही आम्ही आढावा घेतला आहे.शासकीय निमशासकीय संस्थांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक उपाययोजना केली आहे.तसेच टेस्टिंग सुद्धा वाढवण्यास सांगितलं आहे.
मुंबईत आठवडाभरापासून दररोज 500 केसेस
मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढत असला, तरी या केसेस हँडल करण्यासाठी पूर्ण क्षमता आहे. आम्ही आरोग्य विभागासोबत,डीन सोबत बैठक घेतली आहे. मुंबईत आजघडीला दररोज 8 हजार कोरोना टेस्ट होत आहेत, त्या आणखी वाढवाव्या लागणार आहेत. सद्यस्थितीत 95 ते 96 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत, तर 16 ते 17 रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. जिनोम सिक्वेसिंगसाठी आम्ही सॅम्पल पाठवला असून त्याचे रिपोर्ट 2 ते 3 दिवसांत येतील. त्यानंतर कळेल की कोरोनाचा कोणता व्हेरियंट आहे याबाबत स्पष्टता येईल, असे त्यांनी सांगितले.
कोरोना वाढत चालल्याने कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी आपण सगळ्यांनी मास्क घालणे गरजेचं असल्याचे डॉ.संजीव कुमार म्हणाले.
राज्य सरकारही सतर्क
मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. मास्क वापरणं आवश्यक आहे. राज्य सरकारचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी,यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
हे ही वाचलं का ?