Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 739 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी 29 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बुधवारी 295 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर पडली होती. आज 739 नव्या रुग्णांची भर पडल्याने मुंबईची रुग्णसंख्या 46 टक्क्यांनी वाढली वाढली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2970 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,44,005 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2027 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.033% टक्के इतका आहे.






सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2970 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 357 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 452 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 15, रायगड 84, पालघर 41, रत्नागिरी 11, चंद्रपूर 12, नाशिक 17 आणि नागपूरमध्ये 23 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात बुधवारी 1081 रुग्णांची नोंद


बुधवारी राज्यात एक हजार 81 नवे रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. तर 524 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के इतके झालेय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,09,51,360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,88,167 (09.74 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या चार हजार 32 सक्रीय रुग्ण आहेत.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : कोरोनाचा वेग वाढतोय, बुधवारी राज्यात आढळले 1 हजार पेक्षा जास्त रुग्ण, मुंबईने टेन्शन वाढवलं


Rajesh Tope : कोरोना रुग्णवाढ, बूस्टर डोस ते परिचारिका संपाबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती, म्हणाले...