Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत 72 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. शुक्रवारी 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये शनिवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 503 इतके सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,39,148 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी घसरलाय. हा कालावधी 10736 इतका झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.006 टक्के इतका आहे.


सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत 


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 503 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 197 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 79 सक्रीय रुग्ण आहेत. नाशिक 10, अहमदनगर 17, धुळे 12, रायगड 20 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 869 सक्रिय रुग्ण आहेत.





राज्यात आज 197 कोरोना रुग्णांची नोंद 


राज्यात आज 194 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 141 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77, 27, 996 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. 


राज्यात आज एका कोरोना रूग्णाचा मृत्यू 
राज्यात काल एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नव्हता. परंतु, आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 87 टक्के एवढा आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 194 नवे कोरोना रुग्ण, एका रूग्णाचा मृत्यू 


Kids Immunity : कोरोनापासून मुलांचं संरक्षण कसं करावं ? 'या' विटामिनचा करा आहारात समावेश


Coronavirus Cases India : देशात कोरोनाचा संसर्ग सुरुच, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2527 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू