Corona Update : राज्यात आज 194 नव्या कोरोना (Corona Update) रूग्णांची नोंद झाली आहे. तर 141 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  राज्यात आजपर्यंत 77, 27, 996 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. 


राज्यात आज एका कोरोना रूग्णाचा मृत्यू 
राज्यात काल एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नव्हता. परंतु, आज एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 87 टक्के एवढा आहे.  


राज्यात सध्या  869 अॅक्टिव्ह रुग्ण 


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 869 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 503 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 197 तर   ठाण्यात 79 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


 दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. परंतु, काल पेक्षा आज राज्यातील नव्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त आहे. काल राज्यात 121 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. मात्र, यात वाढ होऊन  आज ही संख्या 194 वर पोहोचली आहे. राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजारांखाली आली आहे ही दिलासादायक बाब आहे.  


गेल्या 24 तासांत देशात 2,527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कमी होत असलेल्या कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2,527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल भारतात कोरोनाचे 2,380 नवे रुग्ण आणि 56 रुग्णांचा मृत्यू झाला.  


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 79 इतकी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशात 1656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 17 हजार 724 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे.


महत्वाच्या बातम्या


Kids Immunity : कोरोनापासून मुलांचं संरक्षण कसं करावं ? 'या' विटामिनचा करा आहारात समावेश