Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 499 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 811 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 94 हजार 657 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 624 झाली आहे. सध्या मुंबईत 4,115 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 499 रुग्णांमध्ये 464 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1209 दिवसांवर गेला आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 4115 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 6371 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 2512 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 390, रायगड 802, रत्नागिरी 102, सिंधुदुर्ग 82, सातारा 298, सांगली 96, कोल्हापूर 94, सोलापूर 283, नाशिक 367, अहमदनगर 234, जळगाव 86, धुळे 100, औरंगाबाद 359, जालना 305, बीड 38, लातूर 132, नांदेड 33, उस्मानाबाद 126, अमरावती 73, अकोला 123, वाशिम 239, बुलढाणा 170, यवतमाळ 72, नागपूर 747, वर्धा 57, भंडारा 82, गडचिरोली 25 आणि चंद्रपूरमध्ये 87 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 18672 सक्रिय रुग्ण आहेत.
शुक्रवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यात आज 2760 नव्या रुग्णांची भर पडली असून 2934 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या