Trans-Harbour line Mumbai Suburban Railway : वीजपुरवठा खंडित झाल्याने ट्रान्स हार्बर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. गर्दीची वेळ पाहून रेल्वेने तात्काळ ओव्हरहेड वायरचं काम करत वीज पुरवठा पूर्वरत केला. त्यामुळे आता ट्रान्स हार्बर (Trans-Harbour line) महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. तीन वाजून 10 मिनिटांनी वाहतूक सुरळीत झाली. ठाणे - वाशी (Thane-Washi) आणि वाशी - ठाणे (Washi-Thane) दोन्ही लोकल सुरळीत सुरु झाल्या आहेत. या संदर्भात मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (Shivaji Sutar) यांनी ट्वीट केले आहे.






वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे घणसोली रेल्वे स्थानकात ट्रेन थांबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे ट्रान्स हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झाली. ठाणे - वाशी आणि वाशी - ठाणे दोन्ही मार्गीकेवरील वाहतूक ठप्प झाली होती. वीजपुरवठा बंद पडल्याने वाशीवरून ठाण्याला जाणारी ट्रेन घणसोली रेल्वे स्थानकात बंद पडली. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात आले. आता लोकल सेवा पूर्वरत झाली आहे.  






महत्वाच्या बातम्या :