Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या 24 तासांत नवीन कोरोनाबाधितांसह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 18 हजार 840 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. नव्या आकडेवारीनुसार, 16 हजार 104 रुग्णांनी गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसंर्गावर मात केली आहे. यासह आतापर्यंत देशात एकूण 4 कोटी 29 लाख 53 हजार 980 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.


मुंबईत शुक्रवारी 530 रुग्णांची नोंद, 976 कोरोनामुक्त


मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 530 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.


महाराष्ट्रात शुक्रवारी 2944 नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू


शुक्रवारी राज्यात दोन हजार 944 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर गुरुवारी राज्यात दोन हजार 678 रुग्णांची तर बुधवारी राज्यात 3142 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात तीन हजार 499 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78 लाख 31 हजार 851 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.91% एवढे झाले आहे.






5-12 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा


5-12 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीनं 5-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्स (Corbevax) आणि कोवॅक्सिन (Covaxin) लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार सल्लागार गटाच्या (NTAGI) स्थायी तांत्रिक उपसमितीनं (STSC) 5 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कॉर्बेवॅक्स (Corbevax) आणि कोवॅक्सिन (Covaxin) लस वापरण्यासाठी परवानगी दिली असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. मात्र, या लसींचा लहान मुलांच्या लसीकरणात कधीपासून आणि कशाप्रकारे समावेश करण्यात येईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या