![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbaia Corona Update : मुंबईत आज 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू
मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4654 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
![Mumbaia Corona Update : मुंबईत आज 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू Mumbai Corona Update, 446 corona positive patients were registered in Mumbai last 24 hrs, two died Mumbaia Corona Update : मुंबईत आज 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/16/f3b8c1afa5e1500e24b314c964464dd3_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 446 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 431 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,605 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. मागील 24 तासात मुंबईत एकूण 44 हजार 649 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली
मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4654 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1279 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 39 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 16, 2021
16th September, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/8mkFEJf73X
राज्यात आज 3595 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज 3,595 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 20 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के आहे. राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 49 हजार 342 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,65,29,882 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,11,525 (11.52 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,89,425 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,908 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल. गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)