Mumbai Corona Update : महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून आजही कमी रुग्णसंख्या आढळली आहे. सोमवारी  मुंबईमध्ये 356 कोरोना रुग्ण आढळले आहेत.  तर कोरोना दुपटीचा दर 760 दिवासांवर आला आहे. 

Continues below advertisement


 मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 356 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 949 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 5 हजार 139 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 760 दिवसांवर आला आहे. मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.09% टक्के इतका झाला आहे.  मुंबईत मागील 24 तासांत कोरोनामुळे पाच जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. 






सध्या मुंबईत केवळ एक इमारत सील करण्यात आली आहे. तसंच आज नव्याने सापडलेल्या 356  रुग्णांपैकी 40 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 116  बेड्सपैकी केवळ 1 हजार 407 बेड वापरात आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :