नवी मुंबई : आंदोलन म्हटलं की ते करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. अनेकदा आंदोलनं अधिक तीव्र झाल्याने आंदोलकर्त्यांचं नुकसान देखील होत असतं. दरम्यान नवी मुंबई (Navi Mumbai) येथील महापे एमआयडीसीमधील (Mahape MIDC) एलअँडटी कंपनीसमोर कामगारांनी एका सहकामगाराच्या मृत्यूनंतर धरणे आंदोलन केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मृत कामगराचं शव कंपनीच्या गेटसमोर ठेवत हे आंदोलन केलं आहे.
शुक्रवारी (5 फेब्रुवारी) महापे एमआयडीसीतील एलअँडटी कंपनीमध्ये औषध फवारणी करण्यात येत होती. यावेळी औषध फवारणी करत असताना लोखंडी रॉडवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. दरम्यान मृत कामगार विनोद भोईटे याला कंपनीतर्फे आर्थिक मदत तसेच त्यांच्या मुलीला पात्रतेनुसार नोकरी देण्याची मागणी भोईटे कुटुंबीयांसह कामगार संघटनांनी केली आहे. मात्र ही मागणी अद्याप पूर्ण होत नसल्याने कामगारांनी एलअँडटी कंपनीच्या गेटवरच मृत कामगार विनोद भोईटे यांचा मृतदेह ठेवत मागणी मान्य होई पर्यंत या मृतदेहासह हे आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा कंपनी प्रशासनाला दिला. यावेळी मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून अंत्यविधी साठी तात्पुरते हे आंदोलन थांबविले असले तरी भोईटे कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
- नवी मुंबई शहरातील प्रसिध्द बिल्डरांचा वाद चव्हाट्यावर, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पायाभूत सुविधा आणि घरांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्प सकारात्मक, घरे स्वस्त होण्याचा जाणकारांचा अंदाज
- किचन बजेट आटोक्यात राहणार? खाद्य तेलाच्या किंमतीवर नियंत्रणासाठी सरकारने उचलले पाऊल
- गॅस गिझरनं जीव घेतला? एअर इंडियाच्या महिला वैमानिक रश्मी गायधनी यांचा बाथरुममध्ये मृत्यू
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live