Lata Mangeshkar Memorial : भारतरत्न लतादीदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कावर बनवलं जावं अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. आता काँग्रेसनं देखील लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्क याठिकाणी केलं जावं अशी मागणी केली आहे. 
 
नाना पटोले म्हणाले की, काल बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या  ठिकाणी हजर राहू शकले नाहीत.  माझ्या बहिणीच्या सासू सुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो, आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते.  महाराष्ट्रात सध्या तालुक्यात काँग्रेस कमिटीच्या लोकांना आम्ही सूचना दिल्या आहेत. कालच सर्व ठिकाणी लतादीदींना श्रद्धांजली अर्पण करण्याचं काम केलं आहे.  वर्षा गायकवाड, अस्लम शेख सुद्धा मुंबईबाहेर होते. शनिवार रविवार मुळे अनेकांचे दौरे होते.  अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती.  त्यामुळे आम्ही पोहोचू शकलो नाहीत, असं नाना पटोलेंनी सांगितलं.


नाना पटोले म्हणाले की,  लतादीदी या काँग्रेस परिवारातल्या होत्या.  काँग्रेसने भारतरत्न दिला म्हणून नाही पण त्यांचे योगदान एवढे मोठे आहे.  आता मी लतादिदींच्या परिवाराला सांत्वन करायला जातो आहे. 


शाहरुख खानसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकाला संविधानाप्रमाणे स्वतंत्र आहे की आपल्या धर्मानुसार वागावे. काहीजण मुद्दामून  धर्मावर टीका करून मोठे करण्याचे काम करत आहे.  काही जणांनी दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे असं ते म्हणाले. 


नाना पटोले म्हणाले की, लतादीदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं.  देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील. अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं हे काँग्रेसची भूमिका आहे, असं ते म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या


Lata Mangeshkar Memorial: शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवा; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, संजय राऊत म्हणाले...


 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट