Omicron Origin : कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनने जगभराची चिंता वाढवली आहे. इतर व्हेरियंटच्या तुलनेत हा व्हेरियंट अतिशय वेगाने पसरतो. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या ओमायक्रॉन व्हेरियंटचे उत्पत्तिस्थान नेमकं काय आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील संशोधक करत आहेत. संशोधक दिवसरात्र ओमायक्रॉन व्हेरियंटवर अभ्यास करत आहेत. चीनमधील वैज्ञानिकांनी ओमायक्रॉन व्हेरियंटबद्दल मोठा दावा केला आहे. चीनमधील संशोधकांनी याबाबतचा आपला रिपोर्ट जारी केला आहे. चीनमधील संशोधकांच्या दाव्यानुसार, उंदरापासून ओमायक्रॉनची उत्पत्ती झाली आहे.  


तिआंजिनमध्ये नानकाई विद्यापीठ आणि नॅशनल इंस्टीट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेशन यांच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. त्यांनी आपला रिसर्च जारी केला आहे.   हा रिसर्च बायो सेफ्टी आणि बायो सिक्योरिटी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या नव्या रिसर्चनुसार, कोरोना विषाणू माणसातून उंदरामध्ये गेला. त्यानंतर अनेकदा म्युटेट झाला आणि उंदरामधून ओमायक्रॉनच्या रुपाने माणसांमध्ये आला. 


रिसर्चमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या इतर व्हेरियंटमध्येही नसतील. माणसामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे पाच म्युटेशन आढळलेत, जे उंदराच्या फुफसामध्ये आढळलेल्या म्युटेशनसारखे आहेत. संशोधकांच्या अनुसार, ओमायक्रॉनची उत्पत्तीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ओमायक्रॉनचे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त म्युटेशन आढळले आहेत.
 
ओमायक्रॉनच्या उत्पत्तीबाबत मतमतांतरे -  
जगभरातील वैज्ञानिक ओमायक्रॉन व्हेरियंटवर अभ्यास करत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटची उत्पत्ती नेमकी कशी झाली? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतचे तीन सिद्धांत देण्यात आले आहे. पहिल्या सिद्धांतानुसार, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा व्यक्तीमध्ये ओमायक्रॉन म्युटेट होतो. दुसऱ्या सिद्धांतानुसार, ज्या कोरोना रुग्णांवर याआधी कुणाचेही लक्ष नव्हते अशा रुग्णांमध्ये ओमायक्रॉन म्युटेट होत आहे. तिसऱ्या सिद्धांतात असे म्हटलेय की, एखाद्या माणसाकडून जनावराची एक प्रजाती संक्रमीत झाली. त्यानंतर त्या जनावरामध्ये विषाणू अनेकदा म्युटेट झाला अन् ओमायक्रॉनच्या रुपाने माणसांमध्ये आला.


इतर महत्त्वाच्या बातम्या :