Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा (Mumbai Corona Update) आलेख घसरत आहे.  शुक्रवारी नव्या 32 रुग्णांची आज नोंद झाली आहे. काल 42 बाधित आढळले होते. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार  आज नवे 32 कोरोनाबाधित आढळले असून 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Continues below advertisement


मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 274 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे.  आज नव्याने सापडलेल्या 32 रुग्णांपैकी एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 228  बेड्सपैकी केवळ 15 बेड सध्या वापरात आहेत. 


 






राज्यात गुरुवारी 123 कोरोना  रुग्णांची नोंद 


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून  आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या  911 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.आज राज्यात 123   रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात   दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात  112  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात आज  दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 451  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 94, 20, 815   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


संंबधित बातम्या :


Coronavirus : भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा 'हा' मोठा दावा, काय म्हणाले जाणून घ्या?




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha