Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 2087 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 1802 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 61 हजार 164 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 583 झाली आहे. सध्या मुंबईत 13 हजार 613 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 2087 रुग्णांमध्ये 1992 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 381 दिवसांवर गेला आहे.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 13897 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5174 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 1812 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 752, रायगड 955, रत्नागिरी 66, सिंधुदुर्ग 60, सातारा 36, सांगली 10, कोल्हापूर 26, सोलापूर 28, नाशिक 139, अहमदनगर 68, जळगाव 16, औरंगाबाद 46, लातूर 37, परभणी 11, उस्मानाबाद 12, अमरावती 21, अकोला 21, वाशिम 33, बुलढाणा 19, नागपूर 319, वर्धा 26, भंडारा 32, गोंदिया 18, गडचिरोली 30 आणि चंद्रपूरमध्ये 42 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 23746 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल 4004 रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.
संबंधित बातम्या