Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 123 नव्या रुग्णांची भर पडली आहे. रविवारी चार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रविवारी 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 92 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 815 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,40,351 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 6494 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.010% टक्के इतका आहे.






सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत 


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 815 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 267 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 131 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 16,  रायगड 22 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1304 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात आज 224 कोरोना रुग्णांची नोंद


देशात जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात मात्र त्या उलट चित्र आहे. शनिवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे. आज राज्यात 224 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 196 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात आज 224 रुग्णांची नोंद तर 196 रुग्ण कोरोनामुक्त


Delhi Capitals Covid News : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा कोरोना अहवाल जाहीर; सामन्याबाबत मोठी अपडेट समोर


Coronavirus Cases Today : देशात 3451 नवीन कोरोनाबाधित, 40 जणांचा मृत्यू