मुंबई: देशात जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात मात्र त्या उलट चित्र आहे. शनिवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं आहे. आज राज्यात 224 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर 196 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 


राज्यात आज एका रुग्णाचा मृत्यू
राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,127 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 8,03,79,421 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 78,79,278 इतकी झाली आहे.


राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 1304 इतकी आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 815 रुग्ण हे मुंबईतील असून 267 रुग्ण हे पुण्यामध्ये आहेत. 


देशातील स्थिती
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3451 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 635 इतकी झाली आहे. त्याचा आदल्या दिवशी देशात 3805 नवीन कोरोनाबाधितांची नोद आणि 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासांत 3079 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4 कोटी 25 लाख 57 हजार 495 वर पोहोचला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: