Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 3451 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 635 इतकी झाली आहे. त्याचा आदल्या दिवशी देशात 3805 नवीन कोरोनाबाधितांची नोद आणि 22 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासांत 3079 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यासह आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 4 कोटी 25 लाख 57 हजार 495 वर पोहोचला आहे. 


दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद


नव्या कोरोना रुग्णांमधील सर्वाधिक कोरोना रुग्ण दिल्लीमध्ये आढळले आहेत. दिल्लीत 1407 नवीन कोरोना रुग्ण आणि दोन मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोनो सकारात्मकता दर 4.72 टक्क्यांवर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र 253 नवे कोरोना रुग्ण तर कर्नाटकमध्ये 171 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असून कर्नाटकात कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 635 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 635 इतकी झाली आहे. शविवारी दिवसभरात देशात 3079 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 40 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर वाढून 0.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात देशात 3 लाख 60 हजार 613 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या