Mumbai Corona Update : दिलासादायक! मुंबईत कोरोना रूग्णांमध्ये घट, रविवारी 102 नव्या रुग्णांची नोंद
Mumbai Corona Update : मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, मुंबई महानगरपालिका त्रेक्षातील 107 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Mumbai Corona Update : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवासांपासून चढ-उतार होत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येत आज घट झालीय. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत 102 कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 107 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. तर एका कोरोना बाधित रूग्णाचा आज मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत आज मुंबईतील रूग्णसंख्येत घट आहे. काल मुंबईत 130 रूग्णांची नोंद झाली होती. आज 6715 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामधील 102 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, मुंबई महानगरपालिका त्रेक्षातील 107 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर 98. 2 टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्य 102 रूग्णांपैकी फक्त चार रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित रूग्णांमध्ये गंभीर लक्षणे नसल्याने या रूग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. मुंबईत सध्या 699 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 2, 2022
2 October 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/DWf9EghNRa
मुंबईकरांसाठी दिलासा
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. याबरोबरच सक्रिय रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. महिनाभरापूर्वी राज्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण हे मुंबईत होते. परंतु, आता यात घट होत असून आता पुण्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत. त्याखालोखाल मुंबईत सक्रिय रूग्ण आहेत.
राज्यात 379 कोरोना रुग्णांची नोंद
मुंबई प्रमाणेच राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत देखील घट होत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 379 नव्या कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Update ) नोंद झाली आहे. तर शनिवारी राज्यात 449 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी राज्यात 459 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 400 च्या आत आली आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे.
देशातील स्थिती
देशात कोरोना विषाणूचा संसर्गात देखील घट कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 430 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. देशात एका दिवसात 3 हजार 375 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. काल देशात 3 हजार 805 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात गेल्या 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, देशातील कोरोना सकारात्मकता दर 1.28 टक्के आणि साप्ताहिक कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 1.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या देशात 37 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 45 लाख 53 हजार 42 वर पोहोचली आहे.