Mumbai Corona Cases : मुंबईत आज 693 कोरोनाबाधितांची नोंद तर 575 जणांना डिस्चार्ज
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 693 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 575 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या 24 तासात 693 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 575 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,92,245 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 10,437 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 713 दिवसांवर गेला आहे. आज आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार ठाणे जिल्हा आणि ठाणे मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद नाही. कोविड वाढीचा दर (18 ते 24 जून) 0.09 टक्के आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 25, 2021
२५ जून, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ६९३
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ५७५
बरे झालेले एकूण रुग्ण - ६९२२४५
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%
एकूण सक्रिय रुग्ण- १०४३७
दुप्पटीचा दर- ७१३ दिवस
कोविड वाढीचा दर ( १८ जून ते २४ जून)- ०.०९ % #NaToCorona
राज्यात आज 9,677 नवीन कोरोनाबाधित तर 10,138
राज्यात आज 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. आज 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यत सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.94 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 156 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सरकारकडून आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल
राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.