एक्स्प्लोर

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा दादरमध्ये मोर्चा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढला आहे.

मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढला आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नसल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मालाडमध्ये फेरीवाला सन्मान मोर्चा काढल्यानंतर आज संजय निरुपम दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी आंदोलन करत आहेत. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या आंदोलनात मुंबईभरातील सगळ्या फेरीवाल्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन निरुपम यांनी केलं आहे. दरम्यान, दादर पश्चिमेकडील नक्षत्र मॉल इथून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मोर्चा तिथून सुरु होईल. आधी स्टार मॉलकडून मोर्चा निघणार होता, पण पोलिसांनी नक्षत्र मॉल कडून परवानगी दिल्याने मोर्चा तिथून निघणार आहे. दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं. दरम्यान काँग्रेसचा मोर्चा शिवसेना आणि मनसेचा गढ असलेल्या दादरमध्ये होत असल्यानं पोलिसांनी तुफान बंदोबस्त तैनात केला आहे. तसंच पोलिसांनी मनसेच्या काही नेत्यांची धरपकडही सुरु केली आहे. तर व्यापाऱ्यांनी अनुचित घटनेच्या भीतीनं आपली दुकानं बंद ठेवली आहेत. http://polldaddy.com/poll/9864850/ मनसेचं आंदोलन एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत. मनसे विभाग अध्यक्षाला मारहाण दरम्यान मनसेने मालाडमध्येही फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान  मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात माळवदे यांना जबर जखम झाली. मनसे नेते संदीप देशपांडेंना अटक आणि सुटका मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री उशिरा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. संजय निरुपम यांनी चिथावल्याचा आरोप दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे फेरीवाल्यांनी मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. संजय निरुपम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणीही मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केली. राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले सुशांत माळवदे यांना कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी रविवारी ऑस्कर हॉस्पिटलमध्ये जाऊन माळवदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. शनिवारी संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे. सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल मुंबईतल्या मालाड भागात मनसे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल मालाडमध्ये मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना काही फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली. संबंधित बातम्या काँग्रेस फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार! जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट  … तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला  फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं? नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

महत्त्वाच्या बातम्या

Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget