एक्स्प्लोर

मुंबई काँग्रेस अध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता, 'ही' नावं चर्चेत

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबई काँग्रेस अध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष यावेळी मराठी असेल की अमराठी याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबई काँग्रेस अध्यक्ष लवकरच बदलण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष यावेळी मराठी असेल की अमराठी याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मराठी आणि मराठा समाजातील करायचा असेल तर काँग्रेसपुढे भाई जगताप आणि मधु चव्हाण हे पर्याय आहेत. तर या दोघांसह अमराठी डॉ.सुरेश शेट्टी,  चरणसिंह सप्रा यांचीही नावं चर्चेत आहेत.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावं लागल्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली होती. आता मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबई काँग्रेस अध्यक्ष लवकरच बदलला जावू शकतो. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी ही चार नावं चर्चेत आहेत.

भाई जगताप विधान परिषदेतील आमदार भाई जगताप यांचं नाव मुंबई अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्यांची ही आमदारकीची दुसरी टर्म आहे.  याआधी विधान सभेत ही ते निवडून गेले होते. सध्या मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष ही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांची मुंबईतील महानगर टेलीफोन कामगार संघटना देखील आहे. तसंच त्यांच्याकडं कोकण म्हाडाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी होती. ते मिलिंद देवरा गटाचे नेते मानले जातात. त्यांनी ट्विटर वरून माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर ट्विटरवरून थेट टीका केली होती

मधू चव्हाण मधू चव्हाण हे मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. ते भायखळा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आहेत. मिलिंद देवरा गटातील नेता अशी त्यांचीही ओळख आहे. त्यांनी आघाडी सरकार असताना म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सातत्यानं ते काँग्रेसची बाजू मांडत असतात.

डॉ.सुरेश शेट्टी अंधेरी पूर्व मतदार संघाचे प्रतिनिधित्व डॉ.सुरेश शेट्टी यांनी केले आहे. ते माजी कॅबिनेट मंत्री आहेत. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले नेते अशी त्यांनी ओळख आहे.

चरण सिंह सप्रा मुंबई काँग्रेसचा अमराठी चेहरा असलेले चरण सिंह सप्रा यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून काम केले आहे. मुंबईतील विविध समस्यांसाठी केलेल्या आंदोलनात ते आघाडीवर असतात.  मुंबईतील पीएमसी बँकेतील खातेदाराच्या प्रश्न सतत लावून धरला. मुंबई काँग्रेसचा पंजाबी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Rohullah Mehdi News: अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई
अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन अटक; काशिमीरा पोलिसांची मोठी कारवाई

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Nashik Crime News: 'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
'शुभम लोणकर बोलतोय, दोन कोटी दे नाहीतर...'; बिश्नोई गँगच्या नावाने व्यावसायिकाला धमकी, नाशिकमध्ये खळबळ
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Kangana Ranaut on Tapsee Pannu: ‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
‘बेशरमपणाच्या सगळी मर्यादा पार’, कंगना पुन्हा तापसीवर भडकली; आई-वडिलांनाही ओढलं, म्हणली, ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’
Embed widget