एक्स्प्लोर

मध्य रेल्वेच्या 5 स्टेशनवर अवघ्या एका रुपयात उपचार

मुंबई : मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर अवघ्या एका रुपयात उपचार करता येणं शक्य होणार आहे. पाच रेल्वे स्थानकांवर हे रुग्णालय सुरु करण्यात येणार आहेत. दादर, कुर्ला, मुलुंड, घाटकोपर आणि वडाळा स्टेशनवर पुढच्या आठवड्यापासून हे दवाखाने सुरु सुरु होतील. प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी मध्य रेल्वेने एका खासगी संस्थेसोबत हातमिळवणी करत, एका रुपयात दवाखाना सुरु करण्याची योजना आखली आहे. रेल्वे अपघात, छातीदुखी तसंच प्रसुतीसंदर्भात त्वरित उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. प्रवाशांना सहज आणि स्वस्त दरात वैद्यकीय उपचार मिळावेत, हा यामागील मुख्य हेतू आहे. प्रत्येक दवाखान्यात एमबीबीएस आणि एमडी डिग्री असलेले डॉक्टर रुग्णांच्या सेवेत असतील. 24 तास सुरु राहणाऱ्या या दवाखान्यांमध्ये दर दिवशी त्वचारोग तज्ज्ञ, मधुमेह तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञही असतील. या आठवड्यात पाच स्टेशनवर 'एक रुपयात दवाखाना' सुरु होईल. त्यानंतर मध्य आणि हार्बरच्या 19 स्टेशनवर त्यांचा विस्तार होईल. प्रत्येक पाच स्टेशनवर दरदिवशी किमान 100 प्रवाशांना तपासलं जाईल. या दवाखान्यांमध्ये रक्त तपासणीसह औषधांची दुकानंही उपलब्ध असतील. सर्व रक्ताचे नमुने तपासणीसाठी वडाळ्याच्या पॅथलॉजी लॅबमधील पाठवले जातील. तसंच यात छोटं मेडिकल, पॅथलॉजी किट्सही मिळतील. दरम्यान, मध्य रेल्वेवरील पहिल्या टप्प्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर ही योजना पश्चिम रेल्वे मार्गावरही सुरु करण्यात येईल, असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Mankhurd Chawl Collapse : धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले
धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले
मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget