मुंबई : चेंजिंग रुममध्ये स्विमसूट घालताना शुटिंग करणाऱ्या बिजनेसमनला तरुणीने रंगेहाथ पकडलं आहे. मुंबईतील बांद्रा पश्चिम भागातील कपड्याच्या दुकानात आरोपी स्विमसूट चेंज करणाऱ्या तरुणीचं मोबाईलवर शूट करत होता.

उत्तर प्रदेशातील तरुणीच्या तक्रारीनंतर मुंबईतील बोरीवलीत राहणाऱ्या व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 'मि़ड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

2 जून रोजी तक्रारदार तरुणी बांद्र्यात खरेदीसाठी गेली होती. संबंधित बूटिकमध्ये ती  स्विमिंग कॉश्च्युम पाहत होती, त्यावेळी आरोपी मोविन सार्वालो आपल्याला पाहत असल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत ती स्विमसूट ट्राय करण्यासाठी चेंजिंग रुममध्ये गेली.

तितक्यात चेंजिंग रुमच्या पार्टिशनवरुन एक हात मोबाईलने शूटिंग करत असल्याचं तिच्या ध्यानात आलं. तरुणीने आरोपीला रंगेहाथ पकडताच तो बावचळला. त्याने आपण शुटिंग करत असल्याचं नाकारलं, मात्र तिने आरोपीच्या हातून मोबाईल हिसकावला आणि त्यात तिचे फोटो आढळले.

आरोपी मोविन सार्वालोवर कलम 354 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अटक केली आहे.